Thursday, 10 April 2014

Dr.Prakash Amte the real hero.

Dr. Prakash Amte The Real Hero Marathi Movie

- स्वप्नाली अभंग

डॉ. प्रकाश आमटे द रियल हिरो मराठी चित्रपट । Dr. Prakash Amte The Real Hero Marathi Movie
हेमलकसात साकारतोय ‘डॉ. प्रकाश आमटे द रियल हिरो’
गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील आदिवासीं साठी झटणार्‍या डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित ‘प्रकाश आमटे-द रियल हिरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘हेमलकसा’ अतिशय दुर्गम प्रदेश जिथं वीज, रस्ते या सारख्या पायाभूत सुविधांचाही वणवा पण याच दुर्गम भागात आदिवासीं आणि वन्य प्राण्यांसाठी नंदनवन फुलवणार्‍या डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदा आमटे यांचा जीवनपट या सिनेमातून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
डॉ. प्रकाश आमटे द रियल हिरो
डॉ. प्रकाश आमटे द रियल हिरो
डॉ. मोहन आगाशे, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यासारखे मातब्बर कलाकार या चित्रपटात आहेत. डॉ. मोहन आगाशे हे बाबा आमटे यांची व्यक्ती रेखा साकारत आहे. नाना पाटेकर यांनी तर चित्रीकरणाआधीच २० दिवस हेमलकसात आपला तळ ठोकला. आपण साकारत असलेल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी नानांनी तिथले राहणीमान, स्थानिक भाषा यांचा अभ्यास केला. त्याबरोबरच प्राण्यांना हाताळण्याचा सराव ही केला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तर आपल्या लहान मूलीला घेऊन चित्रकरणासाठी हेमलकसात दाखल झाली आहे. हेमलकसात प्रकाश आमटे आणि त्यांच्या परिवारासोबत व्यतीत घालवलेला वेळ हा लाईफ टाईम अनुभव असल्याची भावना कलाकार व्यक्त करत आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या दिग्दर्शिका समृध्दी पोरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नक्षलवादी तसेच हिंस्त्र प्राण्यांशी सामना करत रोज नवनवीन आव्हानं पेलणार्‍या प्रकाश आमटे याचं समाज कार्य जगापर्यंत पोहचवण्याचा उद्देश या चित्रपट निर्मिती मागे आहे असं समृध्दी पोरं यांनी सांगितलं. या चित्रपटाची निर्मिती एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेतून करण्यात येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हेमलकसा इथं सुरू असून १४० तंत्रज्ञान आणि कलाकारांची टीम हेमलकसा इथं दाखल झाली आहे.
चित्रपटात वास्तविकपणा येण्यासाठी प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी यांनी सुरवातीच्या काळात ज्या वस्तूंनी संसार थाटला त्याच वस्तू चित्रकरणा दरम्यान वापरण्यात आल्या आहेत. शिवाय या भागातील माडिया, गोंड या २०० आदिवासींना चित्रीकरणात सामावून घेण्यात आलं आहे. प्रचंड थंडी, हिंस्त्र श्वापदं आणि दुपारी ४ नंतर पडणारा अंधार या समस्यांशी सामना करत या सिनेमाची टीम हेमलकसात सिनेमा साकारतेय. संपुर्ण टीमला गमबूट वापरण्याच्या सूचना ही प्रकाश आमटे यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. अवघ्या ४० ते ४५ दिवसांत मराठी आणि हिंदी या भाषेत हा चित्रपट पुर्ण करण्याचं आव्हान या सिनेमाच्या कलाकार आणि तंत्रज्ञांनी स्वीकारलं आहे.
हेमलकसात डॉ. प्रकाश आमटे यांनी फुलवलेले नंदनवन पाहण्याची संधी जगभरातल्या प्रेक्षकांना या चित्रपटाद्वारे मिळणार आहे.

No comments:

Post a Comment