ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर कुलकर्णी किंवा ज्ञानेश्वर म. कुलकर्णी याच्याशी गल्लत करू नका.
| संत ज्ञानेश्वर | |
| चित्र:SantDnyaneshwar01.jpg | |
| मूळ नाव | ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी |
| जन्म | इ.स. १२७५ आपेगाव, महाराष्ट्र |
| निर्वाण | इ.स. १२९६ आळंदी, महाराष्ट्र |
| समाधिमंदिर | आळंदी |
| उपास्यदैवत | विठ्ठल |
| संप्रदाय | नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय |
| गुरू | निवृत्तीनाथ |
| शिष्य | विसोबा खेचर |
| भाषा | मराठी भाषा |
| साहित्यरचना | ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, हरिपाठ, अभंग |
| संबंधित तीर्थक्षेत्रे | आळंदी, नेवासे |
| वडील | विठ्ठलपंत |
| आई | रुक्मिणी |
| विशेष माहिती | ज्ञानेश्वरांची भावंडे - निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई |
वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.
अनुक्रमणिका
बालपण
संत ज्ञानेश्वरांचा जन्म विठ्ठलपंत - रुक्मिणीबाई या कुळकर्णी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांच्या थोरल्या भावाचे नाव निवृत्तीनाथ तर धाकट्या भावंडांची नावे सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी होती.त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यासाश्रमाचा स्वीकार केला होता. परंतु गुरूच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. त्या काळातील ब्राह्मण समाजास एका संन्यासी व्यक्तीने गृहस्थाश्रमाचा स्वीकार करणे मंजूर नव्हते त्यामुळे आळंदीच्या ब्राह्मणांनी विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी देहत्याग केला
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना ब्राह्मणांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या.
कार्य
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी. |
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म - वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ७०० वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराष्ट्रात आजही लाखो संख्येने आहेत.
ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ
- भावार्थदीपिका - ज्ञानेश्वरी- या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो.
- स्पुटकाव्य (उदा.अभंग, विराणी, चागदेव पासष्टी, आदि.)
- ज्ञानेश्वर हरिपाठ
- अमृतानुभव
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.) आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरूच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले.
निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले. माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
चित्र:SantDnyaneshwar Samadhi01.jpg
संत ज्ञानेश्वर समाधी (आळंदी)
‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.
[दाखवा]
Dr
B R Ambedkar, popularly known as Babasaheb Ambedkar, was one of the
architects of the Indian Constitution. He was a well-known politician
and an eminent jurist. Ambedkar's efforts to eradicate the social evils
like untouchablity and caste restrictions were remarkable. The leader,
throughout his life, fought for the rights of the dalits and other
socially backward classes. Ambedkar was appointed as the nation's first
Law Minister in the Cabinet of Jawaharlal Nehru. He was posthumously
awarded the Bharat Ratna, India's highest civilian honor in 1990.
In
1936, Ambedkar founded the Independent Labor Party. In the 1937
elections to the Central Legislative Assembly his party won 15 seats.
Ambedkar oversaw the transformation of his political party into the All
India Scheduled Castes Federation, although it performed poorly in the
elections held in 1946 for the Constituent Assembly of India.



Then came turning point in his life, one day he had arrived at the farm
early in the morning. The jowar crop had grown fully in the field and
had to be watched to against predatory birds. He therefore climbed up
and sat on the machan as tilted platform farmers raise for keeping a
watch on the birds and scaring them away. By noon he was still sitting
on the machan. The midday sun was burning in the sky and a bright haze
quinvered on the hot air. The men working in the fields had retired to
their resting places. Due to the heat Debuji was feeling drowsy when
suddenly he saw a figure approaching his machan. As it neared the machan
he could see it was a man. He was indeed a strange man , for he was
wearing a white Kafani, a one-pieace dress that drapes a person from
shoulder to feet. His long hair fell on his shoulder.He borrow to the
man anything. At this moment the stranger smiled which gave him some
courage and he said , “ Do you need anything ? what will you give ?” I
have everything with me” the stranger said.
