सायना नेहवाल (जन्मः १७ मार्च १९९०,
हिस्सार,
हरयाणा) ही एक
भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ती सध्या जागतिक बॅडमिंटन मानांकन यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे. जून २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.
[२]
जुलै ३०, २०१० रोजी सायनाला २००९-१० मधील
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.
[३] मार्च २०१२ मध्ये साईनाने स्वीस ओपन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर जून २०१२ मध्ये थायलंड ओपन ग्रां प्री सुवर्ण सन्मान पटकावला.
[४] २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये तिने कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
कारकिर्दीतील नोंदी[संपादन]
Stage | Opponent | Result | Games | Points |
Group Stage | Jaquet (SUI) | Won | २ – ० | २१ –९ , २१ –४ |
Group Stage | L Tan (BEL) | Won | २ –० | २१ -४ , २१ -१४ |
Pre-Quarter-finals | Yao Jie (NED) | Won | २ –० | २१ -१४ , २१ -१६ |
Quarter-finals | Tine Baun (DEN) | Won | २ –० | २१ -१५ , २२ -२० |
Semi-finals | Wang Yihan (CHN) | Lost | ० –२ | २१ -१३ , २१ -१३ |
Bronze Medal Match | Wang Xin (CHN) | विजयी | | |
- वर उडी मारा↑ [१]
- वर उडी मारा↑ 'सुपर' सायनाने रचला इतिहास
- वर उडी मारा↑ सायना नेहवालला खेल रत्न पुरस्कार
- वर उडी मारा↑ Saina Nehwal rallies to triumph
No comments:
Post a Comment