Friday 28 February 2014

Status Update
By Madhav Sarkunde
आर्णी साहित्य संमेलनाच्या विवध छटा

आदिवासीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात आर्णी येथे विदर्भ साहित्य संघाचे संमेलन २१, २२, २३ फेब्रुवारी २०१४ असे तीन दिवस राहणार आहे. विदर्भ साहित्य संघ ( नागपूर) या संस्थेच्या माध्यमातून विदर्भ साहित्य संमेलन भरविल्या जातात. विदर्भ सहित्य संघ हे कोणत्या विचाराची संस्था आहे हे वेगळ्या शब्दात सांगण्याची गरज नाही. म्हणून आता आर्णी मतदार संघातून बीजेपीचा उमेदवार हमखास निवडून येणार. येथे होऊ घातलेले हे संमेलन त्यासाठीची वैचारिक पूर्व तयारी आहे, अशी एक चर्चा आहे..परंतु दुर्दैवाची बाबा अशी कि दस्तुरखुद ना. शिवाजीराव मोघेच या संमेलनाचे उद्घाटक आहेत.साहेब तर मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांना बीजेपीचा हा डाव कसा लक्षात आला नाही? तर दुसरीकडे अशीही चर्चा आहे कि हे सम्मेलन ना .शिवाजीराव मोघेबनीच आयोजित केले आहे. परंतु माझा या चर्चेवर विश्वास नाही. कारण मोघे साहेब स्वतः मागासवर्गीय आहेत.ते मागासवर्गीय आहेत म्हणूनच त्यांना या मतदार संघात उभे राहाण्याच अधिकार आहे. तेव्हा त्यांना अर्णीत संमेलन घ्याचे असते तर निश्चितच त्यांनी आदिवासी अथवा दलित साहित्य संमेलन घेतले असते. आणखी तिसरी चर्चा अशी कि ना श्री शिवाजीराव मोघे हे मागासवर्गीय आणि कॉंग्रेसचे असले तरी ते विचाराने मात्र बिजेपीच्याच परंपरेचे आहेत असे आर्णी मतदार संघातील उच्च वर्णीयांना दाखविणे गरजेचे आहे,असा घाट कॉंग्रसमधील काही कार्यकत्यांनी घातला व हे संमेलन उभे केले. उच्चवर्णीय संतुष्ट झाले कि पुढचा मार्ग मोकळा होतो. राहिला प्रश्न आदिवासी आणि दलित मतदाराचा.त्यांना करता येते वेळेवर अडजेष्ट थोडीफार आर्थिक मदत करून व दारूचे बक्शे वाटून.( परंतु मोघे साहेब स्वतः असे करत नाहीत ,कारण ते व्यसन मुक्तिवाले आहेत, जे काही करतात ते त्यांचे कार्यकर्ते करतात. त्याला त्यांचाही नाईलाज असतो.) परंतु माझा या तिस-या चर्चेवर सुद्धा विश्वास नाही. कारण ना शिवाजीराव मोघे साहेब अत्यंत सात्विक आहेत. धार्मिक आहेत.

No comments:

Post a Comment