Friday, 28 February 2014

आज दुपारी नाशिक जिल्ह्यातील भंडार द-यातील एका खेड्यातून फोन आला. एक प्रामाणिक कार्यकर्ता आदिवासी राजकारणाविषयी आपली खंत बोलून दाखवित होता. मला त्याच्या बोलण्यात बरेच तथ्थे वाटले. खरेच आज आदिवासी राजकारणाविषयी विचार करण्याची वेळ आली आहे.मागिल ५० वर्षात आदिवासी राजकारणाने काय केले ? या प्रश्नाचा वेध आम्ही घेतला पाहिजे.आज महाराष्ट्रात आमचे २५ आमदार आहेत असे सांगितल्या जाते. परंतु मला ते आदिवासींचे आमदार वाटत नाहीत .कारण त्यांच्याकडे आदिवासी विकासाचा अजेंडाच नाही. ते कुण्या ना कुण्या पक्षाचे बांधील आहे. त्या पक्षाचाच अजेंडा त्यांना राबवावे लागते. नाही राबविला तर त्यांना पुढच्यावेळेस पक्षाचे तिकीट मिळत नाही व मन्त्रीपदही मिळत नाही. म्हणून आमचे आदिवासी आमदार आपल्या पक्षाच्या मार्जिच्याबाहेर कोणतेच कामं करा नाहीत. ही आमच्या लोक प्रतिनिधींची कमजोरी आहे.आणि आपणास ठाऊक आहे कि कमजोर माणस कुणालाच काही देत नसतात. भारतीय राजनीतीची शोकांतिका अशी आहे कि ५० वर्षात या राजकारणाने एक शुद्ध आदिवासीचा खंबीर नेता बनविला नाही .जे बनविले ते सर्व लाभार्थी !आपल्या पक्षाकडून त्यांनी शाळा, आश्रमा शाळा व कॉलेज मिळवून घेतले आणि आपले व आपल्या नातलगाचे भले केले. त्याशिवाय या लोकांनी काहीच केले नाही. तरीही हे लोक नेते म्हणून मिरवतात. हे अत्यंत शरमेची बाब आहे.परतुं मित्रहो ! ह्याला आपणही बरेच जबाबदार आहोत. विशेषतः. शिकलेली मंडळी. सत्य समजून सुद्धा बोलून दाखवत नाहीत .बदलीसाठी अथवा सहेबासोबत फोटो काढता येतो इतक्या शुद्र स्वार्थासाठी सत्याकडे पाठ फिरवून आपण असत्याशी तडजोड करत असतो.आणि नंतर राजकीय नेते ठीक नाहीत म्हणून कांगावा करत असतो.आपला हा दोगलेपणाच स्वार्थी राजकीय नेत्यांच्या पथ्यावर पडत असतो. असत्यावर व आदिवासीविरोधी तत्वावर फुली मारण्याचे धाडस केले पाहिजे. सत्यशोधकाचे काम फक्त असत्या शोधून काढणे एवढ्यापुरताच मर्यादित नसते ; तर ते असत्या तत्व संपुष्टात आणण्यासाठी लढणे अपेक्षित असते. आणि नेमके आपण तेच करत नसतो.म्हणून दोस्तहो ! जे समाजविरोधी आहे त्याचा तुम्ही धिक्कार केलाच पाहिजे.मागील ३० वर्षापासून मी राजकीय लोकांशी विवाद करतो आहे.मला आदिवासी राजकारणाविषयी अनेक प्रश्न पडतात. निर्भीडपणे मी राजकीय नेत्यांना प्रश्न विचारतो.ते नाराज होतात. माझी उपेक्षा करतात. मला त्याची खंत नाही. आदिवासी मंत्री मागासवर्गीय समितीवर ब्राह्मण प्राध्यापकांची नेमणूक करतात. तेव्हा हे मंत्री व्यवस्थेचे किती गुलाम आहेत हेच त्यातून सिद्ध होते. त्यांना वाटते कि आदिवासी जनतेला काही कांदे कळत नाही. आपण काही केला तरी चालते.म्हणून आदिवासी जनतेनी हुशार झाले पाहिजे आणि या नेत्यांना धडा शिकविला पाहिजे.. ती वेळ आता जवळ अली आहे.एक निग्रो कवी आदिवासींच्या हक्काबद्दल सुंदरपणे बोलून जातो तो म्हणोत:

आपण ठेवले प्राण त्या रात्री
मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी
मतपत्रिकेच्य आधारे एखाद्या को-या कर्करीत नोटेसारखेआज दुपारी नाशिक जिल्ह्यातील भंडार द-यातील एका खेड्यातून फोन आला. एक प्रामाणिक कार्यकर्ता आदिवासी राजकारणाविषयी आपली खंत बोलून दाखवित होता. मला त्याच्या बोलण्यात बरेच तथ्थे वाटले. खरेच आज आदिवासी राजकारणाविषयी विचार करण्याची वेळ आली आहे.मागिल ५० वर्षात आदिवासी राजकारणाने काय केले ? या प्रश्नाचा वेध आम्ही घेतला पाहिजे.आज महाराष्ट्रात आमचे २५ आमदार आहेत असे सांगितल्या जाते. परंतु मला ते आदिवासींचे आमदार वाटत नाहीत .कारण त्यांच्याकडे आदिवासी विकासाचा अजेंडाच नाही. ते कुण्या ना कुण्या पक्षाचे बांधील आहे. त्या पक्षाचाच अजेंडा त्यांना राबवावे लागते. नाही राबविला तर त्यांना पुढच्यावेळेस पक्षाचे तिकीट मिळत नाही व मन्त्रीपदही मिळत नाही. म्हणून आमचे आदिवासी आमदार आपल्या पक्षाच्या मार्जिच्याबाहेर कोणतेच कामं करा नाहीत. ही आमच्या लोक प्रतिनिधींची कमजोरी आहे.आणि आपणास ठाऊक आहे कि कमजोर माणस कुणालाच काही देत नसतात. भारतीय राजनीतीची शोकांतिका अशी आहे कि ५० वर्षात या राजकारणाने एक शुद्ध आदिवासीचा खंबीर नेता बनविला नाही .जे बनविले ते सर्व लाभार्थी !आपल्या पक्षाकडून त्यांनी शाळा, आश्रमा शाळा व कॉलेज मिळवून घेतले आणि आपले व आपल्या नातलगाचे भले केले. त्याशिवाय या लोकांनी काहीच केले नाही. तरीही हे लोक नेते म्हणून मिरवतात. हे अत्यंत शरमेची बाब आहे.परतुं मित्रहो ! ह्याला आपणही बरेच जबाबदार आहोत. विशेषतः. शिकलेली मंडळी. सत्य समजून सुद्धा बोलून दाखवत नाहीत .बदलीसाठी अथवा सहेबासोबत फोटो काढता येतो इतक्या शुद्र स्वार्थासाठी सत्याकडे पाठ फिरवून आपण असत्याशी तडजोड करत असतो.आणि नंतर राजकीय नेते ठीक नाहीत म्हणून कांगावा करत असतो.आपला हा दोगलेपणाच स्वार्थी राजकीय नेत्यांच्या पथ्यावर पडत असतो. असत्यावर व आदिवासीविरोधी तत्वावर फुली मारण्याचे धाडस केले पाहिजे. सत्यशोधकाचे काम फक्त असत्या शोधून काढणे एवढ्यापुरताच मर्यादित नसते ; तर ते असत्या तत्व संपुष्टात आणण्यासाठी लढणे अपेक्षित असते. आणि नेमके आपण तेच करत नसतो.म्हणून दोस्तहो ! जे समाजविरोधी आहे त्याचा तुम्ही धिक्कार केलाच पाहिजे.मागील ३० वर्षापासून मी राजकीय लोकांशी विवाद करतो आहे.मला आदिवासी राजकारणाविषयी अनेक प्रश्न पडतात. निर्भीडपणे मी राजकीय नेत्यांना प्रश्न विचारतो.ते नाराज होतात. माझी उपेक्षा करतात. मला त्याची खंत नाही. आदिवासी मंत्री मागासवर्गीय समितीवर ब्राह्मण प्राध्यापकांची नेमणूक करतात. तेव्हा हे मंत्री व्यवस्थेचे किती गुलाम आहेत हेच त्यातून सिद्ध होते. त्यांना वाटते कि आदिवासी जनतेला काही कांदे कळत नाही. आपण काही केला तरी चालते.म्हणून आदिवासी जनतेनी हुशार झाले पाहिजे आणि या नेत्यांना धडा शिकविला पाहिजे.. ती वेळ आता जवळ अली आहे.एक निग्रो कवी आदिवासींच्या हक्काबद्दल सुंदरपणे बोलून जातो तो म्हणोत:

आपण ठेवले प्राण त्या रात्री
मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी
मतपत्रिकेच्य आधारे एखाद्या को-या कर्करीत नोटेसारखे
कसे जगावे हे ठरविण्यासाठी

त्या रात्री प्राण खर्ची घालून
आज आपण तोट्यातच राहिलो
कारण आपल्या लोकांना ठाऊकच नाही
मतांचे मूल्य आणि त्याचीच किमत 
आपण मोजत आहोत आज !
(कवी:डेव्हीड फरार )

धन्यवाद.

कसे जगावे हे ठरविण्यासाठी

त्या रात्री प्राण खर्ची घालून
आज आपण तोट्यातच राहिलो
कारण आपल्या लोकांना ठाऊकच नाही
मतांचे मूल्य आणि त्याचीच किमत
आपण मोजत आहोत आज !
(कवी:डेव्हीड फरार )

धन्यवाद.

1 comment: