Friday, 28 February 2014

"स्वतःला अपमानित वाटेल असा पेहराव करू नका" असे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे एक विधान आहे. तसेच १८३१ मध्ये इंग्रजी लेखक थामस कर्लाइलचे कपड्यांचा शोध व शिंपी व्यवसाय या विषयी 'सर्टोर रिसरतस अशी एक कादंबरी आहे.ह्या सगळ्याचा अर्थ असा कि कपड्यामुळे माणसाच्या व्यक्तीमत्वात भर पडत असते.त्याचा व्यक्तिमत्वाला उभारी येत असते.अत्यंत महत्वाचे म्हणजे त्याची मानसिकता प्रसन्न राहते. आणि मग प्रसन्न मानसिकतेतून सुपीक विचार जन्म घेतात. म्हणून आदिवासींनी सार्वजनिक स्थळी वावरताना सुरेख व सोभेल असाच पेहराव करावा.राहिले भारीचे, जे आहेत तेच कपडे धुवून व प्रेस करून परिधान करावेत.या निमिताने मला खासकरून सांगावे वाटते ते सार्वजनिक मिरवणुकीत केल्या जाणा-या पेहराव संबंधी. अलीकडे बिरसा जयंतीच्या निमित्ताने ज्या मिरवणुकी काढल्या जात आहेत त्यामध्ये संस्कृतीच्या नावावर उघडे नागडे व फाटके वस्त्र घालून सोंग काढले जात आहेत. ही गोष्ट अत्यंत किळसवाणी आहे. आदिवासी संकृतीचा माझा चांगला अभ्यास आहे. मी सांगू शकतो तुम्हाला संस्कृतीविषयी.मला हे सांगा हे असे अभद्र पेहराव तुमची संस्कृती असू शकते का ? आणि ही संस्कृती तुम्ही कोणाला दखवित आहात? कोण मानते तुमच्या संस्कृतीला ? मित्र हो ! आज आमचे जगणे युद्धातले आहे. आणि युद्धासाठी सौर्याची मानसिकता आवश्यक असते.फाटक्या कपड्यातून तुम्हाला कोणती मानसिकता प्राप्त होईल? लोक मयतीला देखील चांगले कपडे घालून जातात.आणि तुह्मी अस्मिता सिद्ध करण्यासाठी जाताना जीर्ण कपड्यात जाता? खरेच तुम्हाला अस्मिता सापडेल का? माझ्या मते बिरसाच्या मिरवणुकीत ज्यांना शक्य असेल त्यांनी सूट-बूट व टाय लावून आले पाहिजे.जगाला दाखवून दिले पाहिजे कि आम्ही सुद्धा काही कमी नाही. आजचा संघर्ष मानसिक पातळीवरचा आहे.म्हणून आमच्या समाजाची मानसिकता सुदृढ होईल असेच आम्ही वर्तन केला पाहिजे. आमचा पेहराव त्याचे एक अंग आहे.तुमचा पेहराव भिकार असेल ;तर मानसिकता सुद्धा भिकारच ! तेव्हा तुम्हीच ठराव काय करायचे ते

No comments:

Post a Comment