Saturday, 21 December 2013

Bhimtola.

भीमटोला

Chaturya Katha 12 - Bheemtola

एकदा धर्मराज दरबारात बसले असता, त्यांच्याकडे एक गरीब ब्राह्मण मदत मागायला आला. धर्मराज त्याला म्हणाले, तु उद्या ये, मी तुला दान देऊन संतुष्ट करीन. 'धर्मराजांचं ते अश्वासन ऎकुन तो ब्राह्मण बाहेर पडला. त्याच वेळी धर्मराजांचं ते बोलणं ऎकलेला भीमही त्या ब्राम्हणापाठोपाठ दरबारातून बाहेर गेला.
दरबारातून बाहेर पड्ताच भिमानं त्या ब्राह्मणाला जरा एका बाजुला बसायला सांगितलं आणि स्वतः तो नगारखान्याकडे गेला.नगारखान्यात दोन प्रकारचे नगारे होते. एक नगारा कुठ्ल्याही तर्‍हेचं संकट आलं असता वाजवायचा होता, आणि त्याचा आवाज अंगावर काटा उभा करणारा होता. दुसरा नगारा काहीतरी आनंदाची वा आश्चर्यांची गोष्ट घडून आली असता वाजवायचा होता आणि त्याचा ध्वनी गोड होता.
नगारखान्यात जाऊन भिमानं आनंदाचा नगारा वाजवायला सूरुवात केली. तो आवाज ऎकुन ‘काय आनंददायी घडले?’ हे पहाण्यासाठी प्रत्यक्ष धर्मराज तिथे आले. स्वतः भीम तो नगारा बडवीत असल्याचं पाहुन त्यांनी विचारलं, भिमा ! असं काय आनंददायी घडलं, म्हणुन तु हा नगारा वाजवु लागलास ?' भीम म्हणाला, 'दादा, आजपर्यंत शास्त्रे व आपला अनुभव आपल्याला असं सांगत आला की, जन्माला आलेल्या कुणाही जिवाला आपल्या आयुष्याचा भरंवसा देता येत नाही. कुणाला केव्हा 'वरचं आमंत्रण ' येईल याची शाश्वती नाही. म्हणून कुठलीही आज करता येण्यासारखी चांगली गोष्ट उद्यावर ढ्कलु नये.
पण नूकत्याच मदत मागायला आलेल्या ब्राह्मणाला ज्या अर्थी तुम्ही उद्या यायला सागिंतले आहे, त्या अर्थी तुम्ही व तो ब्राह्मण किती जगणार आहात, हे तुम्हाला निश्चीतपणे समजलं आहे. ही नवलाची व आनंदाची गोष्ट मला कळली, म्हणून मी हा नगारा वाजवीत आहे.'या भीमटोल्यानं धर्मराजांचे डोळे उघडले. त्यांनी तिथल्या तिथे त्या ब्राम्हणाला मदत केली आणि भीमाच्या चातुर्याची प्रसंशा केली.

No comments:

Post a Comment