घर जोडायचे आहे? तोडणाऱ्यांनो परत या!
शिवसेनाच खरी! बाकी धोतऱ्याच्या बिया!!
संजय राऊत
sanjayraut@rediffmail.com
Download in JPG format
घर जोडायचे आहे? तोडणाऱ्यांनो परत या! | संजय राऊत | Sanjay Raut | Rokh Thok Saamana Article
शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांचीच शिवसेना खरी. श्रम, त्याग व निष्ठा या भांडवलावर ती ४५ वर्षे उभी आहे. कुणी स्वार्थासाठी सोडून गेले म्हणून शिवसेना थांबली नाही. राणे, भुजबळ, राज ठाकरेही गेले. पडझडीचे दिवस सगळ्यांच्याच नशिबी येताट. पण बाळासाहेब ठाकरे यांनी जे पुण्य महाराष्ट्राच्या मातीत पेरले त्यास विषारी फळे येणार नाहीत. उद्धव व राज यांनी एकत्र यावे हा विचार चांगला आहे. त्या चळवळ्यांसाठी मोहलेले हे विचार.
शिवसनेचे काय व कसे होणार या चिंतेने सध्या अनेकांना ग्रासले आहे. आश्चर्य असे की हे चिंतातुर जंतू बहुसंख्येने शिवसेनेच्या बाहेरचे आहेत व त्यातील अनेकांनी शिवसेनेवर घाव घालण्याची एकही संधी सोडलेली नाही.
त्याचबरोबर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकत्र यावे, त्यांचे विलीनीकरण व्हावे यासाठी काही हौशी मंडळी कामास लागली आहेत. ( त्यांना शुभेच्छा! ). या मंडळींच्या उद्योगांना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली आहे.
मुकेश अंबानी व अनिल अंबानी हे दोन भाऊ त्यांचे साम्राज्य टिकविण्यासाठी एकत्र आले. मग उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र का येऊ नये? असे प्रश्न आता विचारले जात आहे.
मुंबईत ‘ठाकरे जोडो’ चळवळ काही लोकांनी सुरू केली महाराष्ट्राचे भवितव्य आता ही चळवळ ठरवणार अशी भाषा त्यापैकी काही मंडळींनी सुरू केली. ठाकरे जोडो आभिमान म्हणजे काय? हे यापैकी कोणीही धडपणे सांगू शकत नाही. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून त्यांच्या मालकीचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ते मोठे झाले व त्याच पक्षाचा त्याग त्यांनीकेला. आज त्यांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी नसून फक्त शिवसेना हाच आहे. शिवसेना कमजोर करणे व मराठी माणसांची एकजूट भुसभुशीत करणे हे त्यांच्या पक्षाचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचे काम सोपे झाले आहे. शिवसेनेस कमजोर करण्याचे काम कॉंग्रेस पक्ष करू शकला नाही. ते काम राज ठाकरे व त्यांच्या पक्षाने परस्पर केले. हा आरोप नसून सत्य आहे व मराठी माणसाने त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे.
कुठल्याशा राजाभोवती तोंडपुन्यांचा भला मोठा तांडा जमा झाला होता. या तोंडपुजे मंडळींत राजाच्या सर्वच म्हणण्याची री ओढण्यात मोठी अहमहमिका लागत असे. एका धूर्त माणसाने ही परिस्थिती हेरून राजाला एक स्वर्गीय पोशाख देण्याच्या थापा मारून आपले उखळ पांढरे करून घेतले आणि एक दिवस राजाला तो अंगराखा घालण्यासाठी स्वारी सिद्ध झाली. जो पुण्यवान असेल त्यालाच हा अंगरखा दिसेल अशी प्रस्तावना करून त्याने अंगरख्याचे बहारदार वर्णन केले. अंगरखा मात्र प्रत्यक्षात नव्हताच. राजेसाहेबांनाही अंगरखा कुठे आहे हे विचारण्याचे धाडस झाले नाही. अंगावरचे सर्व कपडे त्यांनी काढून टाकले आणि धूर्ताने राजेसाहेबांच्या अंगावर अंगरखा चढविल्याचा अभिनय करीत टाळ्या पिटत म्हटले, ‘ वा, वा काय सुरेख बसलाय अंगरखा.’ साऱ्या तोंडपुज्यांनी त्याची री ओढली. राजेसाहेब त्याच थाटात प्रजेला सामोरे गेले. प्रजाही तोंडपुजेपणास कोडगी बनलेली. सर्वांनी राजाचा नागडेपणा दिसत असूनही टाळ्या पिटत अंगराख्याची वाहव्वा केली. पण एका छोट्या मुलाला अजून कोडगेपणाचा स्पर्श झालेला नव्हता. राजाचं ते ध्यान पाहून ते मूल टाळ्या पिटत ओरडू लागलं, ‘राजा नागवा. राजा नागवा!’
शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांचीच शिवसेना खरी. श्रम, त्याग व निष्ठा या भांडवलावर ती ४५ वर्षे उभी आहे. कुणी स्वार्थासाठी सोडून गेले म्हणून शिवसेना थांबली नाही. राणे, भुजबळ, राज ठाकरेही गेले. पडझडीचे दिवस सगळ्यांच्याच नशिबी येताट. पण बाळासाहेब ठाकरे यांनी जे पुण्य महाराष्ट्राच्या मातीत पेरले त्यास विषारी फळे येणार नाहीत. उद्धव व राज यांनी एकत्र यावे हा विचार चांगला आहे. त्या चळवळ्यांसाठी मोहलेले हे विचार.
शिवसनेचे काय व कसे होणार या चिंतेने सध्या अनेकांना ग्रासले आहे. आश्चर्य असे की हे चिंतातुर जंतू बहुसंख्येने शिवसेनेच्या बाहेरचे आहेत व त्यातील अनेकांनी शिवसेनेवर घाव घालण्याची एकही संधी सोडलेली नाही.
त्याचबरोबर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकत्र यावे, त्यांचे विलीनीकरण व्हावे यासाठी काही हौशी मंडळी कामास लागली आहेत. ( त्यांना शुभेच्छा! ). या मंडळींच्या उद्योगांना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली आहे.
मुकेश अंबानी व अनिल अंबानी हे दोन भाऊ त्यांचे साम्राज्य टिकविण्यासाठी एकत्र आले. मग उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र का येऊ नये? असे प्रश्न आता विचारले जात आहे.
मुंबईत ‘ठाकरे जोडो’ चळवळ काही लोकांनी सुरू केली महाराष्ट्राचे भवितव्य आता ही चळवळ ठरवणार अशी भाषा त्यापैकी काही मंडळींनी सुरू केली. ठाकरे जोडो आभिमान म्हणजे काय? हे यापैकी कोणीही धडपणे सांगू शकत नाही. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून त्यांच्या मालकीचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ते मोठे झाले व त्याच पक्षाचा त्याग त्यांनीकेला. आज त्यांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी नसून फक्त शिवसेना हाच आहे. शिवसेना कमजोर करणे व मराठी माणसांची एकजूट भुसभुशीत करणे हे त्यांच्या पक्षाचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचे काम सोपे झाले आहे. शिवसेनेस कमजोर करण्याचे काम कॉंग्रेस पक्ष करू शकला नाही. ते काम राज ठाकरे व त्यांच्या पक्षाने परस्पर केले. हा आरोप नसून सत्य आहे व मराठी माणसाने त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे.
हे अकरा सवाल
महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी जनतेच्या इच्छाआकांक्षांना मूर्तस्वरूप देण्यासाठी जन्म पावलेल्या शिवसेनेची राजकीय हत्या करण्याचा विचार महाराष्ट्रातल्या बहुतेक राजकीय पक्षांच्या मनात शिवसेनेच्या जन्मापासून होता. पण जनतेच्या बळावर व बाळासाहेब ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वामुळे शिवसेना उभी आहे व याच शिवसेनेने सामान्यातल्या सामान्य माणसाला वैभवाने दिवस दाखवले. ज्यांना हे वैभवाचे दिवस सर्वाधिक दिसले त्यांनीच शिवसेना सोडली. शिवसैनिक व मराठी माणूस शिवसेनेबरोबरच आहे. शिवसेनेचे एकत्रीकरण करणे असे ज्या चळवळ्यांना वाटते. त्यांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत.१) शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या कल्याणासाठीच शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना मराठी माणसापासून दूर गेली. मराठी माणसाचे नुकसान शिवसेनेने केल्याचे एकतरी उदाहरण समोर आहे काय?
२) शिवसेनेचे फक्त मराठी मराठी केले तेव्हा शिवसेना मुंबई-ठाणे महानगरपालिकेच्या पुढे सरकली नाही. मराठी माणूस अठरापगढ जातीतच विखुरलेला राहिला. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची गर्जना करताच जातीभेद विसरून सर्व मराठी एक झाले व महाराष्ट्राची सत्ता, दिल्लीचे तख्तही शिवसेनेला काबीज करता आहे. हिंदुत्वाची गर्जना करीत मिळवलेल्या सत्तेमुळे महाराष्ट्रात कल्याण झाले ते ‘मराठी’ माणसाचेच ना?
३) शिवसेना ‘मराठी’पासून दूर गेल्याची टीका करीत जे बाहेर पडले त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे. हिंदुत्वामुळे मिळालेल्या सत्तेमुळेच त्या सगळ्यांची भरभराट झाली. आर्थिक स्थिती सुधारली. कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचे व्यवहार त्यांना करता आले. ‘हिंदुत्व’ यशस्वी झाले नसते तरया सगळ्यांचे उद्योग, व्यापार शिखरावर गेले असते काय?
४) नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते हिंदुत्वाने दिलेल्या सत्तेमुळेच. हे सत्य नाही काह?
५) मुंबईची वाटा कॉंग्रेसच्या महाराष्ट्रद्वेष्ट्या धोरणांनी लावली. मुंबईवरील लोंढे व बांगलदेशांचे आक्रमण हाच खरा धोका आहे. शिवसेनेतून काही नेते बाहेर पडून कॉंग्रेस पक्षात गेल्याने हे लोंढे थांबले काय? ‘मनसे’सारख्या पक्षांनी दोन रिक्षावाले व टॅक्सीवाल्यांना मारल्याने मराठीजनांचे सर्व प्रश्न मार्गी लागले काय? मराठीची लढाई अखंड आहे. ती कधीही न संपणारी लढाई शिवसेना सदैव लढत आहे हे खरे नाही काय?
६) महाष्ट्रात शिवसेनेचे खच्चीकरण करून देशातील हिंदुत्वाची मान पिळायची हे कारस्थान आहे व त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी कॉंग्रेससारख्या पक्षाची आहे. देशविरोधी शक्तींना भीती शिवसेनेचीच आहे. शिवसेना मजबूत राहिली तर धर्मांध, राष्ट्रद्रोही शक्तींना हिंदुस्थानात डोके वर काढता येणार नाही. त्यामुळे शिवसेनाच फोडायची सध्या ते घडताना दिसत नाही काय?
७) कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्यांची पूजा होते असे एकमेव हिंदू नेते फक्त शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे व ते ‘मराठी’ आहेत याचा अभिमन बाळगायचा नाही काय?
८) अमरनाथ यातेकरूवर हल्ले होताच अतिरेक्यांना जशास तसे उत्तर देऊन यात्रा सुरळीत पार पाडणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता कश्मीरातील हिंदूंच्या अमरनाथ यात्रेवर जबर करवाढ केली व अमरनाथ यातेचे दिवस कमी करावेत अशी मागणी फुटीरवादी कश्मीरी पुढाऱ्यांनी केली. हिंदुत्व कमजोर पडत असल्याचे हे लक्षण नाही काय?
९) राज ठाकरे यांच्यासाठी कुराणाचे भाषांतर ‘मराठी’त झाले व मुसलमानांनी हे मराठी कुराण त्यांना भेट दिले. एका बाजूला हिंदूंच्या यात्रांवर कारवाई होत असताना मराठी मुसलमानांना हज यात्रेसाठी जादा अनुदान मिळाले यासाठी राज ठाकरे यांच्या पक्षाने आंदोलन केले. अशा पक्षाचे शिवसेनेत विलीन व्हावे असे करंच कुणाला वाटते काय?
१०) शिवसेनेने मराठी माणसांचे अहित चिंतले नाही व मराठी माणसांच्या कल्याणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी सतत खस्ता खाल्ल्या. शिवसेना सोडून वेगळा पक्ष काढणाऱ्यांनी हा विचार कधी केला काय? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाचा व कार्यपद्धतीचा विषय उकरून काढला व बाहेर पडण्याचे कारन शोधले. त्यात काही अतिशययोक्ती आहे काय?
११) संपूर्ण विदर्भात कॉंग्रसने शेतकऱ्यांच्या जीवनाचे स्मशान केले. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्माहत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुंटुबीयांना आधार देण्यासाठी सावकारी पाशातून त्यांची मुक्तता व्हावी. त्यांचे कर्ज माफ व्हावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी विदर्भासह महाराष्ट्रात अक्षरशः रान उठविले, झंझावती दौरे केले. हे सर्व शेतकरी बांधव मराठी नव्हते काय?
ही तर सगळ्यांची इच्छा!
उद्धव व राज ठाकरे यांनी एकत्र यावे व शिवसेना मजबूत व्हावी असे कुणाला वाटणार नाही? मा. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांनाही तसेच वाटत असावे, पण राज ठाकरे यांना गौतम बुद्धाप्रमाणे स्वतःच घर सोडले. बुद्धाने संन्यास घेतला. राज ठाकरे यांनी नवा राजकीय संसार थाटला हाच काय तो फरक. राज यांनी शिवसेनेत दुफळी माजवू नये यासाठी बाळासाहेबांनी शेवटपर्यंत शर्थ केली. त्यास मी साक्षीदार आहे. त्यांच्या डोळ्यांतले व्यधित भाव मी पुढिल अनेक महिने टिपले आहेत. शिवसेना हीच सगळ्यांची आई आहे व आईशी गदारी करू नये हीच भावना शिवसेना परिवाराची आहे. स्वतःस ज्येष्ठ म्हणवून घेणारे शिवसैनिक आज ‘मनोमीलना’चा जो कार्यक्रम राबवीत आहेत त्यांनीही शिवसैनिक म्हणुन शिवसेनेच्या माध्यमातून हे ‘जोडो’ अभियान केले पाहिजे. तुम्ही शिवसैनिक असाल तर शिवसेना सोडून पळून गेलेल्यांची चिंता पाहण्याची गरज नाही. शिवसैनिक म्हणून भगव्या झेंड्याखाली एकत्र येणे व नव्या पिढीस या झेंड्याखाली आणणे हेच कार्य सगळ्यांनी केले पाहिजे.कॉंग्रेसचाच फायदा
राज ठाकरे यांच्या स्वतंत्र पक्षामुळे मराठी मतांत फूट झाली व शिवसेनेचे नुकसान झाले हे खरे, पण फायदा कोणाचा झाला? फायदा शेवटी मराठीद्वेष्ट्या कॉंग्रेसचा झाला. आंध्रात तेलगू देसमचा पराभव झाला. प्रजाराज्यम पक्षाच्या चिरंजीवीने तेलगू अस्मितेच्या नावावर मते मागितली. त्यात तेलगू देसम हरले व प्रजाराज्यमही संपले. कॉंग्रेसचा लाभ झाला. तामीळनाडूत द्रमुकची सत्ता असली तरी मतविभागणीस लाभ कॉंग्रेसचा झाला. महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे कॉंग्रेसच्या नाकर्तेपणास लाभ मिळाला व पुढची पाच वर्षे पुन्हा कॉंग्रेस बोडक्यावर बसली. राज ठाकरे यांचे १३ आमदार निवडून आले. त्यातले कल्याण, कन्नड, पानशेतचे आमदार हे स्वबळावर निवडून आले. पण इतरत्र शिवसेनेच्या मतांत फूट पाडण्याचे काम त्यांनी केले. जे विधानसभेत घडले ते नंतरच्या संभाजीनगर, नवी मुंबई महानगरपालिकेत घडले नाही. संभाजीनगरची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावरच लढवली व शिवसेना विजयी झाली. म्हणजे राज ठाकरे यांचा पक्ष फार खोलात रुजून शिखर गाठेल अशी स्थिती नाही. त्यांचेसुद्धा अळवावरचे पाणि आहे. ते किती काळ राहणार? शिवसेना हा आजही गावागावांत, तळागाळात घट्ट रुजलेला व कार्यकर्त्यांचे मोहोळ असलेला पक्ष आहे. आणि त्या छत्राखाली सगळ्यांनी एकवटणे हीच काळाची व महाराष्ट्राची गरज आहे. शिवसेनाप्रमुखांनी जे महाराष्ट्राच्या मातीत पेरले व मराठी मनात रुजवले तेच असली बियाणे. बाकी सर्व धोतऱ्याच्य बिया, हाच विचार महत्त्वाचा व त्याच विचारातून चळवळ उभी राहायला हवी.शिवाजीराजे
शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा कारभार केला. शिवरायांनी ज्याप्रमाणे मुसलमान पातशाही तोडली त्याप्रमाणे शिवसेनाप्रमुखांनीही धर्मांध मुसलमानांच्या दाढीस आग लावली. या भूमीत जन्माला आलेले, तिला मानणारे व नव्या हिंदवी स्वरज्याला मानणारे ते महाराष्ट्रीय असे शिवरायांनी ठरवले. म्हणून अष्टप्रधानांच्या सल्ल्याला न जुमानता ५०० पठाणांना त्यांनी फौजेत नोकऱ्या दिल्या. राज्याला एकनिष्ठ ते सर्व मराठे, ते सर्व या राज्याचे नागरिक अशी शिवराजींची भूमिका होती. हीच त्यांची मराठी माणसांची व्याख्या होती. ह इतिहास वाचायला हवा. भैयांचे आक्रमण रोखले पाहिजे, पण दोन भैयांना मारल्याच्या भांडवलावर मराठी माणसांचे हित साध्य होत नाही. सतत संघर्ष, लढाया व कायदेशीर लढाया हाच त्या यशाचा मार्ग आहे. उद्धव व राज ठाकरे यांनी एकत्र आल्याने मराठी माणसाचे हित होईल असे ज्यांना वाटते त्यांनी शिवसेनेने लढलेल्या सर्व लढायांची माहिती सर्वप्रथम नव्या पिढीसमोर भांडायला हवी. उद्धव व राज ठाकरे यांच्या जन्मापासून हा संघर्ष आहेव सुरूच राहणार. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून उडालेल्या या ठिणग्या आहेत.भुजबळ येता का?
छगन भुजबळांसारख्या नेत्यांनी पंचवीस वर्षे सर्व काही भोगून शिवसेना सोडली व कॉंग्रेसच्या वळचणीला गेले. त्यांनाही आता अधूनमधून वाटते की, ‘शिवसेना मजबूत व्हायला हवी. राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवे.’ हा विनोद आहे. भुजबळ तुम्ही शिवसेना का सोडलीत ते सांगा? शिवसेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न आपणच केलात. गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांना अटक करण्यासाठी आपणच जंगजंग पछाडलेत. मग आता आपणास पान्हा का फुटाला आहे? राज ठाकरे परत शिवसेनेत येतील तेव्हा येतील. आधी तुम्ही तरी शिवसेना परिवारात प्रवेश करा. मग राज व उद्धव यांच्याविषयी बोला. आहे तयारी? स्वतःपासून सुरुवात करा व मग दुसऱ्यांना सल्ले द्या. वाटल्यास नारायण राणे यांनाही घेऊन या. गणेश नाईक यांनाही बोलवा. शिवसेना मजबूत करायची आहे ना, घर अभंग ठेवायचे आहे ना! मग या, तुमचे स्वागत आहे. खाल्या मिठाची जाण असेल तर आपण नक्की याल! पण छगनराव, सर्वप्रथम शिवसेना तुम्हीच तोडली, घाव तुम्हीच घातलात. तोडणाऱ्यांनी आता जोडण्याची भाषा करू नये.राजा नागवा !
राज ठाकरे यांच्या पक्षाला तरुणाईचा पाठिंबा मिळाला आहे. आनंदीआनंद आहे. पण तरुणांची मते ही चंचल असतात. राजीव गांधीनाही या पिढीने दगा दिला. पोटाची भाषा त्यांना कधीकाळी कळत होती. शिवसेनेने त्यांच्या पोटास दिले म्हणून ४४ वर्षे त्रुण शिवसेनेबरोबर्च राहिल. आजही आहे. नव्या पिढीणे खस्ता खाल्ल्या नाहीत व त्यांना झगमगाट दिसतो आहे. ते राजकारण नव्हे. शिवसेनेची ताकद श्रमात, त्यागात व निष्ठेत आहे व ती शक्ती राहणारच. जाता जाता एक गोष्ट सांगती व विषय संपवतो.कुठल्याशा राजाभोवती तोंडपुन्यांचा भला मोठा तांडा जमा झाला होता. या तोंडपुजे मंडळींत राजाच्या सर्वच म्हणण्याची री ओढण्यात मोठी अहमहमिका लागत असे. एका धूर्त माणसाने ही परिस्थिती हेरून राजाला एक स्वर्गीय पोशाख देण्याच्या थापा मारून आपले उखळ पांढरे करून घेतले आणि एक दिवस राजाला तो अंगराखा घालण्यासाठी स्वारी सिद्ध झाली. जो पुण्यवान असेल त्यालाच हा अंगरखा दिसेल अशी प्रस्तावना करून त्याने अंगरख्याचे बहारदार वर्णन केले. अंगरखा मात्र प्रत्यक्षात नव्हताच. राजेसाहेबांनाही अंगरखा कुठे आहे हे विचारण्याचे धाडस झाले नाही. अंगावरचे सर्व कपडे त्यांनी काढून टाकले आणि धूर्ताने राजेसाहेबांच्या अंगावर अंगरखा चढविल्याचा अभिनय करीत टाळ्या पिटत म्हटले, ‘ वा, वा काय सुरेख बसलाय अंगरखा.’ साऱ्या तोंडपुज्यांनी त्याची री ओढली. राजेसाहेब त्याच थाटात प्रजेला सामोरे गेले. प्रजाही तोंडपुजेपणास कोडगी बनलेली. सर्वांनी राजाचा नागडेपणा दिसत असूनही टाळ्या पिटत अंगराख्याची वाहव्वा केली. पण एका छोट्या मुलाला अजून कोडगेपणाचा स्पर्श झालेला नव्हता. राजाचं ते ध्यान पाहून ते मूल टाळ्या पिटत ओरडू लागलं, ‘राजा नागवा. राजा नागवा!’
आम्ही त्या लहान मुलाच्या शोधात आहोत.
मराठी कविता
नुसताच प्रवास गांडुगिरीचा
लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.
No comments:
Post a Comment