फ्रेंच राज्यक्रांती

बास्तीय किल्ल्याचा पाडाव, १४ जुलै, इ.स. १७८९
इ.स. १७८९च्या मे महिन्यात भरलेल्या "ल एता-जेनेरो", अर्थात समाजातील पुरोहित, सरंजामदार महाजन व सामान्यजन अशा तीन इस्टेटींच्या, सर्वसाधारण सभेमधून क्रांतीची ठिणगी पडली. जून महिन्यात तिसऱ्या इस्टेटीने टेनिस कोर्टावर प्रतिज्ञा घेतली; तर जुलै महिन्यात बॅस्तिये किल्ल्याचा पाडाव झाला. ऑगस्ट महिन्यात मानवाच्या व नागरिकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात इतिहासप्रसिद्ध झालेल्या व्हर्सायवरच्या मोर्च्याने राजदरबाराला पॅरिसला परतण्यास भाग पाडले. पुढील काही वर्षे विविध मुक्तिवादी गट आणि परिवर्तनवादी प्रयत्नांना हाणून पाडू पाहणारी दक्षिणपंथी राजसत्ता यांच्यादरम्यान संघर्ष झडतच राहिले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
No comments:
Post a Comment