Sunday 8 September 2013

Muktabai.

मुक्ताबाई

(संत मुक्ताबाई या पानावरून पुनर्निर्देशित)
संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत-कवयित्री होत्या. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वरसंत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ होते.
संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांचे स्वतःचेही स्वतंत्र अस्तित्व होते. त्यांनी रचिलेले ताटीचे अभंग हे त्यांच्या नावावर नोंदविलेले आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनांती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते. १

जीवनपट

जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा(घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१) ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा - मातापित्यांचा देहत्याग - ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद - विसोबा खेचर शरण आले - शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी आले. - ताटीच्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वरांना विनवणी - ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती - मुक्ताबाईने चांगदेवाना 'पासष्टी'चा अर्थ सांगितला. - मुक्ताबाईचा पहिला शिष्य - चांगदेव - नामदेवांची भेट - गोरक्षनाथ कृपेचा वर्षाव - अमृत संजीवनीची प्राप्ती - चिरकाल अभंग शरीराचे मिळालेले वरदान - निवडक शिष्यांसमवेत अज्ञातवास - तीर्थयात्रेवरून परतलेल्या ज्ञानादेवादींची भेट - ज्ञानेश्वरांची समाधी (आळंदी) - सोपान व वटेश्वरांची समाधी (सासवड) - चांगदेवांची समाधी (पुणतांबे) - आपेगावी मुक्काम - वेरूळ, घृष्णेश्वर येथे मुक्काम - 'ज्ञानबोध' ग्रंथाची निर्मिती - तापीतीरी स्वरूपाकार झाली. (वैशाख वद्य दशमी)

No comments:

Post a Comment